Friday, October 30, 2009

देव न करो...! (19 Oct 2009)


Someone forwarded this article which was featured in Loksatta. Worth reading :)

प्रशांत असलेकर, रविवार, १८ ऑक्टोबर २००९
‘‘साहेब! माफ करा. अशुभ बोलायला नको. देव न करो पण समजा उद्या दुर्दैवाने तुमचं काही बरंवाईट झालं तर तुमच्यामागे तुमच्या बायकोचं काय होईल?’’
यंदाच्या मार्चमध्ये मला हा प्रश्न एकूण छत्तीस वेळा विचारला गेला. प्रश्न विचारणारे सगळे अर्थातच माझे इन्शुरन्स एजंट मित्र होते. ही मंडळी एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत गायब असतात आणि मार्च महिन्यात अचानक कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवतात. या सगळ्या मित्रांनी माझ्या गळ्यात निरनिराळ्या पॉलिसीज बांधून माझे प्राण अगोदरच कंठाशी आणले आहेत. मार्च महिन्यात तर बूटपॉलिश करायला पैसे उरत नाहीत इतके प्रिमियम मी भरतो. माझ्या इन्शुरन्स एजंट मित्रांचा हा एक प्रश्न माझ्या मनात अनेक प्रश्न उभे करतो.
एक म्हणजे माझ्यापेक्षा यांना माझ्या बायकोची इतकी जास्त काळजी का? याचा अर्थ मी काय समजायचा? हे सगळे मित्र माझ्या मरणावर इतके का टपलेत? मी कधीतरी मरणार आहे म्हणून मी किती पॉलिसीज घ्यायच्या? दुसरी गोष्ट माझी बायको किती खमकी आहे याची त्यांना कल्पना नसावी. तिने माझ्याशी जे लग्न केलं ते केवळ एक जनरीत म्हणून! वडिलांकडे राहायचा कंटाळा आल्यावर एक चेंज म्हणून. बाकी ती स्वयंभू आहे. भाजी मार्केटमध्ये तिच्या मैत्रिणी भेटतात तेव्हा कांद्या-बटाटय़ांच्या जड पिशव्या धरून उभं राहायला, पावसाळ्यात कपडे वाळत घालायच्या दोऱ्या बांधून द्यायला आणि रात्री मांजराने उडी मारल्यावर शुकशुक करून झोपेत माझ्या पाठीत धपाटा मारायला एवढय़ा तीनच गोष्टींसाठी तिला माझी गरज असते. बाकी सगळा संसार ती एकटीच रेटून नेत असते, अगदी आर्थिक बाबीसुद्धा. उलट कधी कधी माझं आर्थिक साहस अंगावर शेकते किंवा मित्राला दिलेले पैसे बुडतात तेव्हा ती मला सुनवते, ‘‘तुम्ही अजिबात कामधंदा न करता नुसते घरात बसा आणि पोरांना सांभाळा. मी तुम्हाला घरात बसून खायला घालते पण बाहेर जाऊन नस्ते उपद्व्याप करू नका.’’ अशा या माझ्या खमक्या बायकोचं माझ्यामागे कसं होईल याची भीती घालून हे इन्शुरन्स एजंट मित्र माझ्याकडे पॉलिसीज मागतात. काय म्हणावं या कर्माला?
हे इन्शुरन्स एजंट मित्र एक वेळ परवडतात. ते निदान फक्त मार्च महिन्यात तरी उगवतात. उरलेले अकरा महिने मी सुखाने जगू शकतो. पण माझ्या मित्रांच्या आणि आजोबांच्या दुसऱ्या एका जातकुळीने वर्षांच्या उरलेल्या काळातही मला सुखाने झोपू द्यायचे नाही असे ठरवलेय. ती जातकुळी आहे-मल्टीलेवल मार्केटिंग आणि कन्झ्युमर प्रॉडक्ट्सची चेन सिस्टिमने विक्री करणाऱ्या प्रतिनिधींची! या जातकुळीत तरुणांपेक्षा वृद्धांचा भरणा अधिक दिसतो. यांची सावज हेरण्याची आणि जाळ्यात पकडण्याची पद्धत मोठी विलक्षण असते. वृद्ध माणसे म्हणून लोक यांना मान देतात. सौजन्याने, आदराने वागतात. त्याला हरताळ फासून बिलंदरपणाने नेमका त्याचाच गैरफायदा घेत ही जातकुळी सध्या फोफावते आहे.
परवा असंच झालं. सकाळी पावणेनऊची वेळ होती. रिक्षावाल्यांचा संप होता. उन्हाळ्यातलं सकाळचं ऊन तापले होते. मी माझ्या प्रेयसीला भेटायला धावत होतो. माझी प्रेयसी रोज सकाळी आठ त्रेपन्नला कर्जतवरून येते. मला अंबरनाथला कडेवर घेते. ठाण्याला पाळणाघरात सोडते आणि स्वत: पुढे मुंबईला जाते. संध्याकाळी तीच मला घेऊन येते. रोज सकाळी तिला भेटण्याशिवाय दुसरा विचार माझ्या मनात नसतो. तर त्या दिवशी सकाळी बुटांच्या नाडय़ा सुटलेल्या आहेत, शर्टिग मागून बाहेर आलेलं आहे, शरीर घामाने ओलंचिंब झालंय, खिशातला मोबाईल वाजतोय आणि गरम भाजीचा डबा पाश्र्वभागावर चटके देतोय अशा अवस्थेत मी तिला भेटायला धावत असताना आमच्या शेजारच्या बोंबलेआजोबांनी मला अडवलं आणि विचारलं, ‘‘माझं तुमच्याकडे थोडं महत्त्वाचे काम आहे. थोडं बोलायचं होतं. तुम्हाला मोकळा वेळ कधी असतो?’’ तिकडे माझी प्रेयसी प्लॅटफॉर्मवर टाहो फोडत होती. ती वेळच अशी होती की मी बोंबलेआजोबांना, ‘मला मोकळा वेळ कधीच नसतो’ असं उत्तर द्यायच्याऐवजी ‘रात्री नऊनंतर या’ असं सांगून टाकलं. त्यांच्याशी एक मिनिट बोलल्याचा परिणाम असा झाला की माझी प्रेयसी मला कडेवर न घेताच निघून गेली. त्यामुळे ऑफिसात तिसरा लेटमार्क लागला आणि एका दिवसाचा खाडा लागला.
त्याच दिवशी रात्री मी घरी जायच्या आधी बोंबलेआजोबा आणि एक सद्गृहस्थ माझी वाट बघत घरात बसले होते. बोंबलेआजोबा म्हणजे आमचे जुने शेजारी. वडिलांचे मित्र. गेल्या महिन्यातच स्टेट बँकेतून रिटायर्ड झाले; पेढे घेऊन आले तेव्हा रिटायरमेंटपूर्वी दोन महिने बँकेने ब्रँच मॅनेजरच्या पोस्टवर प्रमोशन देऊन आपले पेंशन पांच हजारानी कसे वाढवले याची सुरस हकिकत ते सांगत होते. बोंबलेआजी एका शाळेत हेडमिस्ट्रेस आहेत. त्यांचा मुलगा यूएसला असतो. जावई एचएमटीत जालंदरला आहेत. मुलगी पंजाबात असते. वडिलांचे मित्र आणि जुने शेजारी म्हणून त्यावेळी शिणलेल्या शरीराने मी त्यांना सामोरा गेलो.
‘‘हे माझे सीनियर.’’ एवढय़ा तीन शब्दांत बोंबलेआजोबांनी माझी त्या गृहस्थांशी ओळख करून दिली आणि ते कोचवर रेलून बसले. पेपर वाचू लागले. जणू मला त्या गृहस्थांच्या तावडीत आणून देणे एवढीच त्यांची जबाबदारी असावी.
‘‘साहेब! मी अमुकअमुक!’’ त्या गृहस्थांनी सुरू केले, ‘‘मी एका पब्लिक लिमिटेड कंपनीतली नोकरी सोडून फायनान्स कन्सल्टन्सी सुरू केली आहे. आमच्याकडे मल्टीलेव्हल मार्केटिंग व चेनसेल्सच्या खूप योजना आहेत. जर तुम्ही ठरवलंत तर रोज संध्याकाळी फक्त दोन तास काम करून तुम्ही एका वर्षांत दरमहा अडीच कोटी रुपये कमवू शकता. ते पण तुमची आहे ती नोकरी न सोडता. तुम्ही आमच्या योजनेत सामील झालात तर तुमची सगळी स्वप्ने पूर्ण होतील. तुम्ही गाडी, बंगला घेऊ शकता. फॉरिन टूरला जाऊ शकता. अनिता विल्यम्ससारखं पर्यटनासाठी अंतराळात जाऊ शकता.’’
माझी अंतराळात पर्यटनाला जायची इच्छा नव्हती पण एकदा बायका-पोरांना घेऊन शिर्डी आणि शनिशिंगणापूरला जायची इच्छा होती. बरीच वर्षे पैसा आणि सुट्टी यांची सांगड बसत नसल्याने ते राहून जात होते. निदान ती इच्छा तरी पुरी होईल या हेतूने मी विचारले, ‘‘तुमची नेमकी योजना काय आहे?’’
‘‘फार सोपं आहे, साहेब!’’ ते गृहस्थ सांगू लागले. ‘‘तुम्ही फक्त बावीस हजार रुपये भरून आमचे मेंबर व्हायचं. त्याच्या बदल्यात वीस हजारांच्या वस्तूंचा गिफ्टसेट लगेच तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही फक्त दोन हजार रु. गुंतवता. तेवढय़ावर तुम्ही दरमहा अडीच कोटी कमवू शकता. तुम्ही मेंबर झालात की तुम्ही फक्त चार मेंबर करायचे. उजव्या बाजूला एक,पाठीमागे एक, डोक्यावर एक नि पायाखाली एक. त्या मेंबर्सच्या बावीस हजारातले अर्धे पैसे तुम्हाला कमिशन म्हणून मिळतात. मग ते चारजण जे सोळा मेंबर्स करतील त्यातला पाव भाग तुम्हाला मिळेल. अशा तऱ्हेने तुमचे नेटवर्क वाढतच जाईल. पुढे तुम्हाला दरमहा हॅण्डसम कमिशन मिळू लागेल.’’
‘‘बरं तुम्ही जो वीस हजारांचा गिफ्टसेट देता त्यात काय वस्तू असतात?’’ मी उत्सुकतेने विचारलं. दोन हजारांत अडीच कोटी कमवायची आयडिया काही वाईट नव्हती. ‘‘हे बघा, साहेब!’’ ते गृहस्थ मला एक फोल्डर दाखवू लागले, ‘‘हा अमेरिकेतल्या ओरिएंटो कंपनीचा नेलकटर! याची किंमत साडेचार हजार रु. आहे. अर्नॉल्ड श्वाट्झनेगर याच नेलकटरने नखे कापतो. ही टिगीफुगी जपानी कंपनीची आयब्रो पेन्सिल. नऊ हजारांची. शेरॉन स्टोन या पेन्सिलीने पापण्यांचे केस रंगवते. ही अशीतशी झाली गोची कंपनीची बुटाची लेस. हिची किंमत सहा हजार रुपये आहे. सचिन तेंडुलकर याच नाडीने बूट बांधतो. हा झकमारी कंपनीचा सँडल टो. कॅथरीन झेटा जोन्स हाच टो सँडलला लावते. हा बारा हजारांचा आहे. हा कुठल्याही सँडलला फिट बसतो. बाईच्या उंचीप्रमाणे याची उंची कमी जास्त करता येते. आणि हा घ्या फाशीकराकाशी कंपनीचा पाच हजारांचा बनाना स्टँड. तुम्ही घरात खायला केळे आणता आणि विसरून जाता. या स्टँडला केळांचा घड लटकवून डायनिंग टेबलवर ठेवला तर जेवणानंतर केळी खायची आहेत हे तुमच्या लक्षात राहते.’’
त्या वस्तू, त्यांची उपयुक्तता आणि त्यांच्या किमती ऐकून मला चक्कर आली. या सगळ्या वस्तू घाटकोपरच्या बाजारात फुटपाथवर दहा-दहा रुपयांना मिळतात. ‘‘साहेब!’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘या अशा वस्तू विकण्यापेक्षा तुम्ही डाळ, तांदूळ, साखर, गोडेतेल अशा उपयुक्त वस्तू का नाही विकत?’’
‘‘छे छे!’’ ते गृहस्थ अगदी तिरस्काराने म्हणाले, ‘‘मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्ये डाळ-तांदूळ-साखर अशा फालतू गोष्टी विकल्या जात नाहीत. आमची कंपनी रिप्युटेड कंपनी आहे आणि या वस्तू वापरण्यासाठी विकत घ्यायच्याच नसतात. या वस्तू घेऊन तुम्ही मेंबर बनता व कमिशन चालू होते. म्हणून घ्यायच्या.’’
‘‘काहीतरी उपयुक्त असेल तर सांगा नाही तर जाऊ द्या,’’ मी त्यांना निर्वाणीचं सांगतलं.
‘‘या सगळ्या वस्तू उपयुक्तच तर होत्या,’’ ते गृहस्थ निर्ढावलेले, बनेल, बिलंदर आणि शहाजोगही होते.
‘‘तसं नव्हे!’’ मी म्हटलं, ‘‘माझ्या एखाद्या समस्येवर उपयोगी पडू शकेल असं काहीतरी असेल तर सांगा.’’
‘‘तुमची एखादी समस्या सांगा मी लगेच त्यावर उपाय सुचवतो.’’ ते कॉन्फिडन्टली बोलले.
मला ऐन वेळी स्वत:ची समस्याही आठवेना. मी डोकं खाजवू लागलो. बऱ्याच वेळाने मला माझी एक सनातन समस्या आठवली. मी म्हटलं, ‘‘म्हणजे बघा माझ्या मुली रोज अंथरूण ओले करतात. सगळे उपाय झाले. खूप पैसे खर्च झाले. डॉक्टरी उपाय झाले. शिर्डीला नवस करून झाला. अजून तो फेडायची वेळ काही आली नाही. मी व बायको दोघेही वैतागून गेलो आहोत. बायको म्हणते ही माझ्या घरातली आनुवांशिक सवय असावी. तिच्या माहेरी कुणाला अशी सवय नव्हती. खाली प्लास्टिक टाकते तर मुली ते बाजूला सरकवून अंथरूण ओले करतात. आम्हाला पार जीव नको झालाय.’’
‘‘ साहेब! तुमचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा!’’ ते गृहस्थ ओरडले. ‘‘तुम्ही जपानी गादी विकत घ्या. त्या गादीवर झोपले की आरोग्यविषयक सर्व प्रश्न सुटतात. मुलं अंथरूण ओलं करत नाहीत. सगळे रोग दूर पळून जातात.’’
‘‘काय सांगता?’’ मी अत्यानंदाने ओरडलो, ‘‘म्हणजे मुलींच्या अंगावर पित्त उठणे, आईचा संधिवात, सासुबाईंचा जळवात, माझी पाठदुखी, बायकोची डोकेदुखी? सगळं नाहीसं होऊन जाईल साहेब! सगळे एकदम ठणठणीत व्हाल. तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही. शिवाय तुम्ही दोन गाद्या अजून विकल्यात तर तुमचे गादीचे पैसे वसूल होतील.’’
मला अतिशय आनंद झाला. नाही तरी डॉक्टरवर खूप खर्च होतोच. पोरं आळीपाळीने आणि मी व बायको आलटूनपालटून आजारी पडतो. गादीची किंमत पंच्याहत्तर हजार होती, पण त्यामुळे डॉक्टरचा खर्च वाचला असता. शिवाय मी माझ्या मेव्हण्याला व बहिणीला सहज गंडवून दोन गाद्या कशाही विकल्या असत्या आणि माझे पैसे वसूल केले असते.
मी गादी विकत घ्यायच्या फॉर्मवर सही केली. त्या मल्टीलेव्हल मार्केटिंग स्किमचा मेंबर बनलो.
पंचाहत्तर हजारांची सर्व रोग दूर करणारी गादी घरी आली. आम्ही मुलींना गादीवर झोपवले. चारी बाजूंना उश्या लावल्या व दोघे दोन टोकांना चटया टाकून झोपलो.
रात्री मला स्वप्न पडले की, जपानी गादीचे मार्केटिंग मी फारच यशस्वी रीतीने केले आहे. अनेकांची दुर्धर दुखणी मी विकलेल्या गाद्यांवर झोपल्यामुळे नाहीशी झाली आहेत. सगळे लोक जपानी गादीवर झोपू लागलेत. डॉक्टर्स बेकार झालेत. मेडिकल्स ओस पडतील. स्पेशालिस्ट, एक्सरेवाले, लॅबवाले यांची पायरी कुणी चढत नाहीए. डॉक्टर्स-मेडिकलवाले व लॅबवाले आपला कमिशनचा जुना हिशेब सेटल करायच्या मागे लागलेत. मेडिकलवाले पाचशे टक्के प्रॉफिटचा दुसरा धंदा कोणता याच्या विवंचनेत पडलेत. डॉक्टरनी सरबताच्या गाडय़ा काढल्या आहेत. दर एक तारखेला हॉस्पिटलच्या कर्जाचा हप्ता भरायची वेळ आल्यावर सर्दीच्या पेशंटला आयसीयूत भरती करायच्या जुन्या सवयीनुसार ते सरबताच्या ग्लासाची किंमत चार हजार रु. सांगताहेत. मॅटर्निटी हॉस्पिटलातल्या सगळ्या डिलिव्हरीज नॉर्मल होऊ लागल्या आहेत व गरोदर बायकांच्या नवऱ्यांवर केलेल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करायची वेळ येत नाहीए. स्पेशालिस्ट, मेडिकलवाले व लॅबवाले या तिन्ही प्रजाती नष्ट होऊन जनतेला खऱ्या आरोग्याचा लाभ झाला आहे. अशा स्वप्नात मी रंगून गेलो. गाद्या विकून मी करोडपती झालोय.
पहाटे बुडाला ओलं लागलं म्हणून मी जागा झालो, असंही स्वप्न पडतं. लाईट लावून बघतो तर मुलींचा सवयीत काहीही फरक पडला नव्हता. पंच्याहत्तर हजारांची सर्व आरोग्यप्रद गादी घेऊनही अंथरूण ओलं झालंच होतं.
आपल्याला सुखी राहण्यासाठी किती पैसे लागतील याचा मी एक हिशेब मांडला. दोन रुपयांचाच गजरा पण आठवणीने आणला तर बायको पंधरा वर्षांपूर्वीचा तो रोमँटिक ‘ग्लान्स ’ देते. मी चुकून लवकर घरी आलो तर दोन्ही मुली माझे हात धरून पिंगा घालू लागतात. त्या पिंग्यातली मजा काही और असते. त्यासाठी काहीही पैसे लागत नाहीत. आईचे जळवात झालेले पाय साजूक तूप लावून काशाच्या वाटीने चोळले की तिच्या डोळ्यांत मायेची निरांजनं पेटतात. आजारी आजीची दोन मिनिटं खर्च करून प्रेमाने विचारपूस केली की तिचा थरथरता सुरकुतलेला हात माझ्या कानशिलावर फिरतो आणि हृदय भडभडून येतं. गुरुवारी दत्ताच्या देवळातला प्रसाद आणून वडिलांच्या हाती ठेवला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. या सगळ्या गोष्टी करायला काहीच खर्च येत नाही.
पोटापुरते पैसे मी कमवतोच आहे. घरात रोज अनेक भांडणं होतात, पण आजवर पैशाच्या कमतरतेवरून कधीही भांडण झालं नाही. बायकोने माझ्या मर्यादा ओळखल्या आहेत. त्या मर्यादांमध्ये ती सुखी आहे. रोज संध्याकाळी लोकांच्या सौजन्याचा गैरफायदा घेत सचिन तेंडुलकरच्या बुटाच्या आणि शेरॉन स्टोनच्या परकराच्या नाडय़ा विकण्यापेक्षा तो वेळ मी घरात दिला तर माझं कुटुंब अधिक आनंदी राहील. शेवटी माझ्या कुटुंबाचा आनंद-सुख हे मी किती पैसे कमवून आणतो यापेक्षा मी घरात किती वेळ देतो यावर जास्त अवलंबून आहे, हे आता मला समजलं आहे.

Thursday, October 29, 2009

NASA IMAGES OF RAMAYANA BRIDGE

Sent: Monday, October 30, 2006 8:04 PM
Subject: NASA IMAGES OF RAMAYANA BRIDGE

Hi

WE ALL KNOW THAT THERE IS VARADI ( Bridge) BETWEEN INDIA AND SRILANKA WHICH WAS CONSTRUCTED BY VANARA SENA IN TRETA YUGA. BUT NOW NASA PEOPLE FIND IT THAT IT IS THERE AND THEY NAMED IT AS "
IS IT CORRECT TO CALL the ancient Bridge WITH THAT new and Alien Name???? THINK OF IT.
Will they ever accept if we change the name of the London Bridge as "Laxman Jhoola"?
SO, NOW, WE WILL SPREAD THE TRUTH ALL OVER THE WORLD. DO YOUR CONTRIBUTION, SEND THIS TO EVERYBODY.
NASA SHUTTLE IMAGES OF A MYSTERIOUS ANCIENT BRIDGE BETWEEN INDIA AND SRILANKA
Courtesy : NASA Digital Image Collection
Adam's Bridge made of chain of shoals, c.18 mi (30 km) long, in the Palk Strait between India and Sri Lanka, reveals a mystery behind it. The bridge's unique curvature and composition by age reveals that it is man made. The legends as well as Archeological studies reveal that the first signs of human inhabitants in Sri Lanka date back to the a primitive age, about 17,50,000 years ago and the bridge's age is also almost equivalent. This information is a crucial aspect for an insight into the mysterious legend called Ramayana, which was supposed to have taken place in tretha yuga (more than 17,00,000 years ago). In this epic, there is a mentioning about a bridge, which was built between Rameshwaram ( India ) and Srilankan coast under the supervision of a dynamic and invincible figure called Rama who is supposed to be the incarnation of the supreme. This information may not be of much importance ! to the archeologist s who are interested in exploring the origins of man, but it is sure to open the spiritual gates of the people of the world to have come to know an ancient history linked to the Indian mythology.

 
 



Mi Aani Mazi Bayko [मी आणि माझी बायको ]

मी आणि माझी बायको
२२ जून 2006

Outlook Tip - do not make the mistake of sending a mail without subject

Feb 2006.

----------------------------------------------------------


Just add this macro to the Outlook.
1. Open your outlook.
2. Press Alt+F11. This opens the Visual Basic editor.
3. On the Left Pane, You can find "Microsoft Outlook Objects", expand this.
4. Now, Double Click on "ThisOutLookSession".
5. Copy and Paste the following code in the right pane. (Code Pane).

Private Sub Application_ItemSend(ByVal Item As Object, Cancel As Boolean)
Dim strSubject As String
strSubject = Item.Subject
 
If Len(strSubject) = 0 Then
Prompt$ = " Subject Line is Empty. Would you like to continue?"
If MsgBox(Prompt$, vbYesNo + vbQuestion + vbMsgBoxSetForeground, "Check for Subject") = vbNo Then
Cancel = True
End If
End If
End Sub

6. Now close the VB Code editor and take a breath. >From now on, this macro will make sure you do not make the mistake of sending a mail without subject..